Ayaadi sutra and its importance
“आयादी सूत्र " वास्तू शास्त्रातील महत्वपूर्ण अध्याय
_____________________________________________________________________
वास्तुशास्त्र वर अनेक साहित्य ,मासिके , किंवा वर्तमान पत्रातील पुरवणी द्वारे लेख
प्रसिद्ध होतात . बऱ्याच लोकांना वरील साहित्य वाचून स्वतः वास्तू
तज्ज्ञ आहोत असे भासते , कारण
अश्या साहित्य लेखनात वास्तू
शास्त्रातील वरवरची साधारण माहिती
दिली जाते . मूळ ग्रंथाचे वाचन करतांना वास्तू शास्त्रातील तांत्रिक बाबींचे आकलन होत
नाही म्हणून तितका भाग
वगळून फक्त समजण्यास सोप्या अध्यायाचे वाचन केले जाते.
एक मला विचारावे वाटते, आपण
कोणतीही वस्तू तयार करायची
असल्यास त्या साठी लागणारे सर्व साहित्य या निसर्गातील विज्ञान शाळेतून घेतो . जसे घर बांधण्यासाठी लागणारी रेती , लाकूड , दगड इत्यादी मग घराची लांबी, रुंदी, उंची निश्चित करण्यासाठी निसर्गाने वापरलेले मोजमापाचे एकक ( अंगुल
किंवा यव) का वापरात
नाहीत ?
कारण नुसत्या वस्तू वापरून
आपण निसर्गाशी पूर्णपणे संयुक्त होऊ शकत नाही . पूर्णपणे निसर्गाशी संयुक्त होण्या साठी वस्तू
बरोबर निसर्गाचे एकक
व गुणोत्तर प्रमाण बद्धता घ्यायला हवी , हे ज्ञान आपल्या महान
ऋषी मुनींनी आपल्या अध्यात्मिक शक्ती च्या आधारावर प्राप्त केले , ज्याला आयादी सूत्र असे म्हणतात .
या संपूर्ण ब्रह्माण्डात काळा
शिवाय कोणी हि श्रेष्ठ नाही , सर्व काही काळाच्या हाती
आहे , "काळ- आकाश ( time space unit ) " चे प्रमाण एकक
म्हणजे परम परमेश्वराचे गणितीय
वरदान आहे . याच एककाचा
वापर आयादी सूत्रात केला
आहे . हे एकक प्रचंड परिणामकारक आहे . भारतीय पुरातन वास्तू च्या
अभ्यासात मला आयदी चा वापर
प्रकर्षाने दिसतो आहे . प्राचीन मंदिरे , किल्ला, लेणी इत्यादी सर्व आयदी
सूत्राप्रमाणे . भारतीय पुरातत्व विभागाच्या परवानगी ने मी महाराष्ट्रातील विविध प्राचीन स्थळांचा अभ्यास
आयादि सुत्रांच्या माध्यमातून केला आहे . कैलास मंदिर
, घृष्णेश्वर मंदिर
वेरूळ , त्रिंबकेश्वर मंदिर , नासिक , नागनाथ मंदिर, हिंगोली , शिवनेरी किल्ला
जुन्नर ( पुणे) ,आगाखान महाल ( पुणे ) , महाकालेश्वर मंदिर, भोजपूर येथील
भोजेश्वर मंदिर , कोल्हापूर चे महालक्षीमी मंदिर , काळाराम मंदिर नासिक इत्यादि , या सर्व वास्तू
, वास्तुशास्त्रातील अयादी सूत्रांचा वापर
करून बांधण्यात आल्या
आहेत . मंदिरातील परमेश्वरी ध्वनी
कंपने किती प्रभावी आहेत
हे आपण तेथे गेल्यावर अनुभवतोच . तर सांगण्याचे तात्पर्य हेच की आपली वास्तू
बांधण्यासाठी जसे आपण निसर्गातील दगड , माती , लाकूड , इत्यादी चा वापर करतो
त्या प्रमाणेच निसर्गाचे (मोजमाप
एकक) अंगुल अथवा
हस्त वापरले तर परमेश्वरी ध्वनी कंपनांचा सकारात्मक प्रभाव आपल्या वर होऊन , आपले
आयुष्य समृद्ध आणि निरोगी
होईल यात तीळमात्र शंका
नाही . इतके
या सूत्रांना महत्व
आहे .
दाक्षिणात्य महर्षी मय व उत्तर भारताचे महर्षी विश्वकर्मा लिहितात " राजाचा महाल असो को सामान्य मनुष्याचे निवास्थान , नगर असो अथवा जलस्त्रोत्र , मंदिर असो कि ग्राम सर्व काही आयदी गणितीय सूत्र परीक्षणातून निर्माण करावे . आयदी विपरीत वास्तू सर्व दोषांस कारणीभूत ठरेल.
मनुष्य जेंव्हा आई च्या उदरातून बाह्य जगात प्रत्यक्ष येतो तो क्षण म्हणजे त्याची जन्म वेळ. वेद उपनिषद स्पष्ट सांगतात कि हे ब्रह्माण्ड कंपित आहे . ज्या क्षणी मनुष्याचा जन्म होतो त्या वेळी ब्रह्माण्डातील जे ध्वनी कंपने ते त्या व्यक्ती ची आंतरिक ध्वनी कंपने होतात . पृथ्वीची आंतरिक ध्वनी ऊर्जा आणि वैश्विक ध्वनी ऊर्जा यांची सांगड मनुष्याच्या आंतरिक ध्वनी ऊर्जेशी मिळवण्याचे वास्तू शास्त्रातील गणितीय सूत्र म्हणजेच आयदी सूत्र व त्याचे एकक होय . पृथ्वी व पृथ्वी तळावरील प्रत्यक वस्तू हि पृथ्वीच्या अमर्याद ध्वनी कंपनाच्या प्रभावाने भारित आहे . या अमर्याद ध्वनी कंपनांना विशिष्ट आयदी गणितीय सूत्राच्या आधारे मर्यादा घालून त्या परमेश्वरी ध्वनी कंपनांना मनुष्याच्या आंतरिक ध्वनी कंपनांसोबत सांगड घातली कि ती कंपने मनुष्याला सुखदायक ठरतात .ज्या मुळे मनुष्याचे आयुष्य सुख समृद्धी ने भरून जाते हेच वास्तू शास्त्रातील गुपित रहस्य आहे
लेखक
राहुल सरोदे
(वैदिक आर्किटेक्ट)
आँसिएंट वास्तू शास्त्र एजुकेशन, परभणी
मो. 9420034555
www.ancientvastushastra.com
No comments:
Post a Comment